पोलीस बॉईजचा खा. उन्मेश पाटील यांनी वाढविला उत्साह

0

चाळीसगाव: कोरोना विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्या जनता करफ्यूची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रसाशन सज्ज झाले आहे. आरोग्याची, आपल्या परिवाराची चिंता न करता अहोरात्र सेवा देणाऱ्या पोलिसांच्या पावलावर पाऊल ठेवत पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलांनी अर्थात पोलीस बॉईजने पोस्टर जनजागृती केली. या जनजागृतीत मुलांचा उत्साह वाढवण्यासाठी खा. उन्मेष पाटील सहभागी झाले.

यावेळी खा. पाटील यांनी पोलीस बॉईजच्या अभिनव उपक्रमाचे अभिनंदन करत जनतेला आवाहन करत उद्या जनता करफ्यूचे पालन करण्याचे आवाहन केले. शहरातील सिग्नल चौकात पोलीस बॉईजने रस्त्याच्या बाजूला उभे राहून पोस्टर जनजागृती केली. यावेळी संपदा पाटील, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक रावसाहेब कीर्तिकर, रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार, रवी राजपूत, अमोल चव्हाण, संदीप गवळी उपस्थित होते.