पोलीस नाईक विनोद अहिरे यांना क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार

0

जळगाव । मू.जे.महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या इव्हेटं मॅनेजमेंट विभागातर्फे कला व क्रीडा क्षेत्रात जंनी उल्लेखनिय कामगिरी केलेली आहे, त्यांचा सन्मान करण्यात आला. त्यात जळगाव जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेले पोलीस कराटे/स्केटींग प्रशिक्षक विनोद अहिरे यांना जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे व मू.जे.महाविद्यालयाचे प्राचार्य उदय कुलकर्णी यांचे हस्ते उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार देवून गौरविण्यात आले. विनोद अहिरे हे क्रीडा क्षेत्रात गेल्या 24 वर्षापासून कार्यरत असून ते कराटे, स्टेकींग, आईस हॉकी, जलतरण या खेळाचे राष्ट्रीय खेळाडू आहेत.

डॉ.जालींदर सुपेकर यांनी केला सत्कार: 2015 मध्ये लद्दाक (काश्मीर) येथे झालेल्या राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केलेले आहे. आणि महाराष्ट्र पोलीस दलाचे पहिले आईस हॉकी पटू ठरलेले आहे. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल पोलीस अधिक्षक डॉ.जालींदर सुपेकर यांनी त्यांना आपल्या दालनात बोलवून त्यांचा सत्कार केला. त्याप्रसंगी पोलीस उपअधिक्षक (गृह) एम.बी.पाटील व स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंशसिह चंदेल उपस्थित होते. तसेच अपर पोलीस अधिक्षक मोक्षदा पाटील, पोलीस मानव संसाधन कार्यालयाचे पोलीस निरीक्षक घुमरे व राखीव पोलीस निरीक्षक शालीक उईके यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.