पोलीस, डॉक्टर यांच्यातच देव, त्यांचा सन्मान करा: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे जनतेला आवाहन

0

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. सध्या परिस्थिती कठीण आणि संयमाची आहे. अशा परिस्थितीत संयम ठेवणे आवश्यक आहे. पोलीस, डॉक्टर अहोरात्र झटत आहे. देव मंदिरात देवळात नाही तर पोलीस, डॉक्टर यांच्या रूपाने माणसात आहे. पोलीस आणि डॉक्टर प्रचंड तणावात असून त्यांचा सन्मान ठेवा, आदर करा असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे. आज ते राज्यातील जनतेशी संवाद साधत होते. आज जे दिवस संपूर्ण जग अनुभवत आहे ते कोणालाही अपेक्षित नव्हते. जाती, धर्म हा भेदभाव कोरोनात नसून सर्व धर्मियांसाठी सारखेच दिवस आहेत, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

Copy