पोलीस जलतरण तलाव, मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन

0

जळगाव । जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून नुतणीकरण करण्यात आलेल्या पोलीस जलतरण तलाव व पोलीस मल्टीपर्पज हॉलचे उद्घाटन आज शनिवारी सकाळी 9.30 वाजता नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्याहस्ते करण्यात आले. जिल्हा पोलिस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विनयकुमार चौबे जळगावात आले होते. या तपासणी दरम्यान, शनिवारी सकाळी जलतरण तलाव पोलिस मल्टीपर्पज हॉल नुतरणीरणाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर, अपर पोलिस अधीक्षका मोक्षदा पाटील, अपर पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, उपविभागीय पोलिस अधीकारी सचिन सांगळे, उपविभागीय पोलिस अधीक्षक गृह महारू पाटील, मनिष कलवाणीया, समीर शेख, सदाशिव वाघमारे, पोनि.श्रीकांत घुमरे, शालीक उईके, रावसाहेब गायकवाड, कमलेश नगरकर, सतिष देसले, जयंत चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते.

जलतरण तलावाची पाहणी
पोलिस अधीक्षकांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या पोलिस मल्टीपर्पज हॉल येथे विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच प्रदर्शन भरविण्यात येत असतात. तसेच या ठिकाणी लग्नसंमारही होतात. सदर हॉल हे भाड्याने देण्यात येते. यातच जलतरण तलाव देखील पोलिस कर्मचार्‍यांसह इतर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सभागृहासाठी नोंदणी पोलीस अधिक्षक कार्यालयातील वेलफेअर विभागात करता येणार आहे. यातच आयजींनी जलतरण तलाव तसेच हॉलची पाहणी केली. तसेच वार्षिक तपासणीत सर्व कामांचा आढाव घेवून काम समाधान कारक असल्याचे स्पष्ट केले. यातच सकाळी पोलिस कर्मचार्‍यांकडून विविध प्रात्यक्षिक करण्यात आले. तसेच परेड देखील घेण्यात आली. तसेच चित्तथरारक प्रात्यक्षिक पाहण्यासाठी चांगलीच गर्दी जमली होती.