Private Advt

तोतया पोलिसाने केली तिकीट निरीक्षकाला मारहाण : पुणे-हावडा आझादहिंद एक्सप्रेसमधील घटना

भुसावळ : 12129 पुणे-हावडा आझादहिंद एक्स्प्रेसमध्ये तिकीट निरीक्षक सतीश रामदास नागदेवे (भुसावळ) यांना तोतया पोलिसाने मारहाण करीत त्यांच्याजवळील मोबाईल हिसकावला. या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा
19 रोजी पहाटे नागदेवे हे एसी कोच क्रमांक ए- 2 मध्ये तिकीट तपासणी करीत असताना कोच अटेंडंटच्या बाकड्यावरील संशयीत प्रवाशाने आपण पोलिस असल्याचे सांगितले मात्र ओळखपत्र विचारले असता ते दाखवले नाही व नंतर कोच बी.3 मध्ये हाच संशयीत प्रवासी पुन्हा जावून बसल्याने नागदेवे यांनी तिकीटाची विचारणा केली असता संशयीत प्रवाशाने हुज्जत घालून मारहाण करीत मोबाईल हिसकावत गाडी बाहेर फेकण्याची धमकी दिली तसेच बराच वेळ गळा दाबून ठेवला. नागदेवे यांनी कशीबशी सुटका केल्यानंतर सहकार्‍याला आपबिती सांगितल्यानंतर भुसावळ लोहमार्ग पोलिसात अज्ञात संशयीत प्रवाशाविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक विजय घेर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.