पोलिसांवर गोळीबार, तिघा आरोपींना अटक

रावेर : गस्तीवरील पोलिसांवर ठासणीच्या बंदुकीतून गोळीबार करणार्‍या दोघा आरोपींच्या अटकेनंतर उर्वरीत तीन आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गोळीबारप्रकरणी गारबर्डी येथील रमेश जगन पावरा (वय 30) व सुनेश लालसिंग पावरा (वय 25) यांना अटक करण्यात आल्यानंतर गुरुवारी विजय मगरसिंग पवार, दिनेश जबरसिंग बारेला, दशरथ शिकार्‍या पावरा (सर्व रा.गरबर्डी) यांना पोलिसांनी अटक केली. अधिक तपास सहा.पोलिस निरीक्षक शीतलकुमार नाईक करीत आहेत.