पोलनपेठ परिसरातून दुचाकी लांबवली

जळगाव- पिंप्राळ्यातील मैत्रिणीचा कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या सामाजिक कार्य करणार्‍या तरुणीचा विनयभंग रविवारी दुपारी झाला. याबाबत रामानंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पिंप्राळ्यात सासर असलेल्या विवाहितेचा मागील तीन वर्षांपासून पतीसोबत कौटुंबिक वाद सुरू आहे. त्यामुळे विवाहिता हताश झाली. तिने हा प्रकार सामाजिक महिला कार्यकर्त्यांकडे कथन केला. त्यानंतर विवाहितेसह मैत्रिणीला पिंप्राळ्यात गेल्या. सामाजिक कार्यकर्त्या व मैत्रिणीने विवाहितेला नांदण्यास सांगितले. परंतु, या विषयी वाद उफाळला. विवाहितेचा पती राकेश राजेश गोटे यांनी सामाजिक कार्यकर्त्यांना शिविगाळ केली. तसेच तरुणीचा विनयभंग केला. विवाहितेची सासू भारती राजेश गोटे यांनी देखील शिविगाळ करुन गुन्हा दाखल करण्याचा दम दिला.
याप्रकरणी विवाहितेसह सामाजिक कार्यकर्त्या रविवारी दुपारी 1 वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गेल्या. याबाबत सुरुवातीला विवाहितेचा पती व सासू विरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. सामाजिक कार्यकर्त्या पोलीस ठाण्यात असताना विवाहितेचा पती राकेश गोटे तिथे आला. त्याने शिवागाळ केली. यासंदर्भात रात्री 1 वाजेच्या सुमारास सामाजिक कार्यकर्त्यांच्या फिर्यादीवरुन विवाहितेचा पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल झाला.