Private Advt

पोर्नोग्राफी प्रकरणात शिल्पा शेट्टीचाही सहभाग?

मुंबई : पोर्नोग्राफिक कंटेंट प्रकरणी अभिनेत्री शिल्ला शेट्टी हिचा पती उद्योगपती राज कुंद्रा याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं अटक केल्यानंतर विविध खुलासे आता होऊ लागले आहेत. सध्या राज कुंद्राची कसून चौकशी केली जात आहे. या चौकशीतून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. याचदरम्यान पोलिसांनी देखील एक महत्वाची माहिती दिली आहे. सदर प्रकरणात राज कुंद्राची पत्नी शिल्पा शेट्टीची देखील चौकशी होऊ शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज कुंद्राच्या ज्या ज्या कंपन्या आहेत, त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सुद्धा भागीदार आहे. त्यामूळे त्याच्या कंपनीतून सुरू असलेल्या या रॅकेटमध्ये शिल्पा शेट्टीचा समावेश आहे का? यावर अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.

राज कुंद्रा याच्या जवळपास २३ कंपन्यांमध्ये शिल्पा शेट्टी भागीदार आहे. यात ज्या कंपनीमधून हा सर्व प्रकार सुरू होता त्या व्हिआन कंपनीत सुद्धा अभिनेत्री शिल्पा शेट्टी भागीदार आहे. त्यामूळे या प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा सुद्धा सहभाग असू शकतो, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येते आहे. ज्या अ‍ॅपच्या माध्यमातून अश्लील क्लिप विकण्याचा प्रकार सुरू होता, अशाच प्रकारचा आणखी एक अ‍ॅप ‘जेएल ५०’ याचं सोशल मीडिया ब्रॅण्डींग देखील शिल्पा शेट्टीनं केलं होतं. त्यामूळे राज कुंद्राच्या अटकेनंतर तिला सुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येणार असल्याची शक्यता आहे.
सध्या तरी या प्रकरणात शिल्पा शेट्टीचा कोणताही सक्रिय सहभाग निदर्शनास आलेला नाही, असं देखील पोलिसांनी सांगितलं आहे.

शर्लिन चोपडा अन् पूनम पांडेसोबत करार

या प्रकरणाशी निगडीत आता नवनवे कनेक्शन्स समोर येऊ लागले आहेत. यात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही राज कुंद्रासोबत कनेक्शन असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सायबर सेलमधील सुत्रांच्या माहितीनुसार या प्रकरणात अभिनेत्री शर्लिन चोपडा आणि मॉडेल पूनम पांडे यांचंही नाव आरोपी म्हणून समोर आलं होतं. या दोघांचाही जबाब महाराष्ट्र सायबर सेलनं नोंदवून घेतला आहे. दोघिंनीही राज कुंद्राविरोधात आरोप केल्याचीही माहिती समोर आली आहे. राज कुंद्राला गेल्या वर्षी याप्रकरणात कोर्टाकडून अंतरिम जामीन देखील मिळाला होता आणि जामीन अर्जावरील अंतिम सुनावणी या महिन्याच्या अखेरीस होणार आहे.
शर्लिन चोपडा हिनं राज कुंद्राची मालकी असलेल्या आर्म्सप्राइम मीडियासोबत करार केला होता. भारताबाहेरील कंपन्यांच्या काही अ‍ॅप्ससाठी अश्लील कंटेंट उपलब्ध करुन देण्यासाठीचा करार करण्यात आला होता. शर्लिन चोपडा सेमी पोर्नोग्राफिकच्या आधारावर एक अ‍ॅप चालवत होती. हे पार्टटाइम काम काही चांगलं चालत नव्हतं त्यामुळे तिनं राज कुंद्राशी संपर्क केला होता. राज कुंद्रासोबत करार करुन ५० टक्के नफ्याच्या वाट्यावर दोघांमध्ये करार झाला होता. राज कुंद्रानं स्वत: या करारावर स्वाक्षरी केली होती. जून २०१९ आणि जुलै २०२० दरम्यान दोघांनी खूप चांगली कमाई केली. पण करारानुसार पैसे आपल्याला मिळत नसल्याचं शर्मिल चोपडा हिला लक्षात आलं आणि तिनं एका वर्षानंतर करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. शर्लिन हिनं त्यानंतर पुन्हा एकदा स्वत:चं अ‍ॅप तयार केलं आणि काही महिने त्यातून चांगले पैसेही कमावले.