पोटनिवडणूकीत काँग्रेस उमेदवाराची बिनविरोध निवड

0

यावल। येथील प्रभाग क्रमांक ‘ब’च्या महिला राखीव जागेची पोटनिवडणूक अखेर बिनविरोध झाली आहे. या एका जागेसाठी दोन अर्ज होते. शेवटच्या दिवशी शहनाजबी शेख अय्युब यांनी माघार घेतल्याने शमशाद बेगम मोहंमद खान यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.

पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत प्रभाग ‘ब’ या जागेवर काँग्रेसच्या आबेदाबी तस्लीम खान विजयी झाल्या होत्या. मात्र, निकालाच्या दुसर्‍याच दिवशी त्यांचे निधन झाले. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. येथे काँग्रेसकडून दिवंगत नगरसेविका आबेदाबी यांच्या सून शमशाद बेगम मोहंमद खान यांना उमेदवारी देण्यात आली होती. त्यांच्या विरोधात शहनाजबी शेख अय्युब या माजी नगरसेविकेने अर्ज दाखल केला होता. मात्र, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हाजी शब्बीर खान, मुस्तफा खान, शहराध्यक्ष कदीर खान आदींनी पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. यानुसार शहनाजबी यांनी माघार घेतली.