पॉपस्टार जस्टिन बिबेर भारतात

0

मुंबई । पॉप जगतातवर अधिराज्य गाजवणारा आणि ग्रामी पुरस्कार विजेता कॅनेडीयन गायक जस्टिन बिबेर 10 मे रोजी मुंबईत गाणार आहे. त्यामुळे समाजमाध्यमांवर सध्या जस्टिनच्या या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. भारतातही जस्टिनच्या चाहत्यांची संख्या लक्षणीय असल्यामुळे त्याचा हा भारत दौरा त्यांच्यासाठी पर्वणीच ठरणार आहे. त्याच्या दौर्‍याबाबत असलेली अनिश्‍चितता अखेर संपल्यामुळे जस्टिनच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. व्हाईट फॉक्स इंडियाचे संचालक अरुण जैन यांनी जस्टिन भारतात येत असल्याची अधिकृत घोषणा केली. 10 मे रोजी नवी मुंबईतील डी. व्हाय. पाटील मैदानावर जस्टिनच्या पर्पज वर्ल्ड टूरची जादू त्याच्या चाहत्यांना अनुभवायला मिळणार आहे.

काही वर्षांपूर्वी यु नो यु लव्ह मीफ या गाण्याद्वारे जस्टिनने त्याच्या आवाजाची आणि अदांची जादू चाहत्यांवर केली होती. त्या गाण्याने खर्‍या अर्थाने जस्टिन बिबरला एक नवी ओळख दिली, असे म्हणयाला हरकत नाही. जस्टिन भारतातच नव्हे तर, तेल अविव आणि दुबईलाही भेट देणार आहे. जस्टिनच्या या ङ्गपर्पज टूरफमध्ये आतापर्यंत त्याने अमेरिका, कॅनडा आणि जपान या देशांना भेट दिली आहे.

जस्टिनच्या या कार्यक्रमाची तिकिट विक्री 22 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या तिकिटांची किंमत 4 हजार रुपये असणार आहे. जगभरातील संगीतप्रेमींनी जस्टिनच्या अनेक गाण्यांनी अक्षरशः भुरळ पाडली आहे. त्यापैकी ‘व्हेअर यू नाऊ’, ब्बॉयफ्रेण्ड’, ‘लव्ह युव्हरसेल्फ’, ‘कंपनी’, ‘अ‍ॅज लाँग अ‍ॅज यू लव्ह मी’, ‘व्हॉट डू यू मीन’, ‘बेबी‘, ‘पर्पज’ यांसारखी गाजलेली काही गाणी यावेळी सादर होण्याची शक्यता आहे.