Private Advt

पैसे न दिल्याने जावयाने सासुलाच केली मारहाण !

जळगाव : सासुकडे पैसे मागितल्यानंतर ते न दिल्याने संतप्त झालेल्या जावयाने सासुबाईंनाच शिविगाळ करीत काठीने मारहाण केल्याची धक्कादायक घटना मन्यारखेडा येथे घडली. या प्रकरणी नशिराबाद पोलिसात जावयाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पैसे न दिल्याने जावयास राग अनावर
जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील मन्यारखेडा गावातील बालिबाई भारमल राठोड (42) या आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास असून त्यांनी मुलगी ही जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनीत संतोष बबलू पवार यांना दिली आहे. मंगळवार, 26 एप्रिल रोजी पहाटे 5.30 वाजता संशयीत आरोपी व जावई संतोष पवार हा सासुबाईंकडे पैसे मागण्यासाठी आला असता त्यास पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून संतोष पवार याने शिवीगाळ करून काठीने सासू बालिबाई राठोड यांना मारहाण केली व पळ काढला. बालिबाई राठोड यांनी जखमी अवस्थेत नशिराबाद पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर जावई संतोष पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार रवींद्र तायडे करीत आहे.