पैसे द्या कृती आराखडा मांडा अन् सभासद व्हा

0

जळगाव : मागील पाच वर्षापासून वादात असलेले दोडे गुर्जर समाजाची वार्षीक सर्वसाधारण सभेत यावेळी देखील किरकोळ वादात झाले. संस्थानची सर्वसाधारण सभा दोडे गुर्जर बोर्डिग येथे पार पडली. पाच वर्षापूर्वी दोडे गुर्जर संस्थानच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरुन वाद झाले होते. समाजासाठी काही करण्याची तयारी असलेल्या समाज बांधवांनीच पुढे यावे व ज्या समाजबांधवाची समाजाच्या विकासासाठी स्वतः पैसे देण्याची किंवा पैसा उभारण्याची तयारी असेल त्यांनीच संचालकपदाच्या निवडणूकीत सहभाग घ्यावे असे आवाहन दोडे गुर्जर समाजाच्या बैठकीत करण्यात आले. दोडे गुर्जर संस्थानचे 17 सदस्यीय संचालक मंडळ असून यात 4 महिलांचा समावेश आहे. याप्रसंगी नामदार गुलाबराव पाटील, डॉ.राधेश्याम चौधरी, चंद्रशेखर पाटील, प्रा.एल.ए.पाटील, वसंत चौधरी आदी समाज बांधव व्यासपीठावर उपस्थित होते.

समाजासाठी कृती आराखडा मांडा
दोडे गुर्जर समाजाच्या विकासासाठी चांगली कल्पना तयार करुन कृती आराखडा आखण्याची तयारी असेल अशा समाजबांधवाला संचालक मंडळात सहभागी करण्यात येणार आहे. केवळ पदाचा उपयोग करुन प्रतिष्ठेसाठी संचालक होवू नका असे आवाहन करण्यात आले. संचालक पदासाठी इच्छुक असलेल्या समाज बांधवांनी अगोदर स्वतः पैसे द्यावे व समाजातून पैसा उभारणी करावी. अध्यक्षपदासाठी इच्छुक असलेल्यांनी 25 लाख रुपये देणगी देण्याची तयारी ठेवावी असेही बैठकीत आवाहन करण्यात आले.

समाज बांधवांतर्फे लाखोंची देणगी
संचालक पदाच्या निवडणूकीत सहभाग घेण्यासाठी इच्छुकांना देणगी देण्याची अट घातल्यानंतर समाज बांधवांतर्फे लाखोंची देण्याची घोषणा केली. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लकी टेलर यांनी वैयक्तिक समाजासाठी 11 लाख रुपये देणगी जाहीर केली. तसेच इतर समाज बांधवांनी देखील पदाची अपेक्षा न ठेवता वैयक्तिक देणगी जाहिर केली. ज्या समाज बांधवाची समाजाच्या विकासासाठी लाखो रुपये खर्च करण्याची तयारी असेल त्यांनाच संचालक मडळाच्या घेतले जाईल अशी अट घातल्याने समाजाच्या विकासासाठी काही करण्याची तयारी असून देखील फक्त पैसे नसल्यामुळे काही होतकरु समाज बांधवाला संस्थानात स्थान दिले जात नसल्याने काही समाज बांधवांनी नाराजी व्यक्त केली.