पैश्यांसाठी गरीब बँकांबाहेर रांगेत,काळा पैसावाले झोपलेत- शरद पवार

0

नगर : नोटांबदी निर्णयावरून पुन्हा एकदा शरद पवारांनी आसुड ओढले आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा असणारे सुखात झोपत आहेत तर गरीब पैश्यांसाठी बँकांबाहेर रांगेत उभे आहेत, असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटाबंदी निर्णयावर टीकास्त्र सोडले आहे. निवडणुकीपूर्वी त्यांनी परदेशात असलेला काळा पैसा जनतेच्या खात्यात टाकणार, असं मोदींनी म्हटलं होतं. त्याला जनता भूलली. मोदींनी परदेशात चकरा मारल्या, स्वित्झर्लंडला गेले, पण तिथून मोकळ्या हाती परतले.

जिल्हा सहकारी बँकेच्या अद्ययावत यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले आहे. काळा पैसा बाहेर काढण्याला आमचा पाठिंबा आहे. पण काळा पैसा असणारे सुखाने झोपत आहेत, मात्र गरीब बँकेच्या रांगेत उभे आहेत. ते आजही बँकांबाहेर रांगा आहेत. घरातील एक माणूस बँकेत उभा असतो, अशी टीकाही पवारांनी मोदींवर केली.काळा पैसा बाहेर काढण्याला आमचा पाठिंबा आहे. पण काळा पैसा असणारे सुखाने झोपत आहेत, मात्र गरीब बँकेच्या रांगेत उभे आहेत. ते आजही बँकांबाहेर रांगा आहेत. घरातील एक माणूस बँकेत उभा असतो, अशी टीकाही पवारांनी मोदींवर केली.साडे 15 लाख 42 हजार कोटी जुन्या नोटांपैकी 14 लाख कोटी नोटा बँकेत पुन्हा परतल्या आहेत. खरंतर नोटाबंदीनंतर सरकारला 3 लाख कोटींचा काळा पैसा सापडेल, अशी अपेक्षा होती. मग काळा पैसा कुठे आहे? तो अजून सरकारच्या हाती लागला नाही,असा सवालही केला. ’नोटाबंदीमुळे शेतकरी, सहकार क्षेत्र अडचणीत सापडलाय. अनेक उद्योगांनी कामगार कपात सुरू केली आहे. अशीच परिस्थिती राहिली तर कायदा सुव्यवस्था बिघडून देशाचे अंतर्गत स्थैर्य धोक्यात येईल.

मोदींनी ऑपरेशन चांगले केले पण नंतरची काळजी न घेतल्यास पेशंट दगावेल, अशी कोपरखळीही त्यांनी मारली. दरम्यान, ’काळा पैसा बाहेर काढणे चूक नाही. मात्र निवडणुकीपूर्वी परदेशातील काळा पैसा जनतेच्या खात्यात टाकणार, असे मोदी म्हणाले होते. मोदी स्वित्झर्लंडला गेले, पण तिथून मोकळ्या हाती परतले’, असा टोलाही शरद पवार यांनी मोदींना हाणला.