पैशाचा तगादा करत डांगुर्णेत विवाहितेचा छळ

0

शिंदखेडा। नोकरी असल्याचे खोटे सांगून लग्नात फसविले तसेच माहेरुन दोन लाख रुपये आणत नाही या कारणावरुन सासरच्या लोकांनी छळ केल्याची तक्रार विवाहितेने शिंदखेडा पोलिसात केली आहे.

शोभाबाई सुनिल कोळी (वय 24) रा.डांगुर्णे ता.शिंदखेडा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनिलच्या कुटूंबाने सुनिलचे लग्न शोभाबाईशी लावले त्यानंतर शेतात विहिर खोदण्यासाठी माहेरुन दोन लाख रुपये आणावेत यासाठी सासरच्या लोकांनी तिचा शारिरीक मानसिक छळ केला. गेल्या दोन वर्षांपासून ते तिला छळत होते. त्यांनी तिच्या अंगावरील दागिणेही काढून घेतले. याप्रकरणी सुनिल कुवर, वेडू कुवर, कमलबाई वेडू कुवर, रावसाहेब महादू बोरसे, अभिमन कुवर यांच्यासह 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.