पेस-भूपतीचा व्हॉट्सअ‍ॅप वाद फेसबुकवर झळकतो आहे

0

मुंबई । टेनिस मधील वाद पुन्हा उफळला आहे. भारताचे टेनिसस्टार लिअँडर पेस व महेश भूपती याच्यात गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू होता. मात्र तो वाद चव्हाट्यावर आला नव्हता. मात्र उझबेकिस्तान विरूध्दच्या डेव्हिस कपमध्ये लिअँडर पेसला स्थान मिळाले नाही आहे. त्यामुळे दोघामधील वाद उफाळून आला आहे. हा वाद आता मर्यादीत न राहता तो व्हॉट्सअ‍ॅपचा वाद फेसबुकवरपर्यंत येवून पोहचला आहे. पेस-भूपती याच्यातील वाद कमी होतांना दिसत नाही आहे. तो वाढतांना दिसत आहे. पेससोबतच्या व्हॉट्सअप चॅटचा स्क्रीन शॉट भूपतीने फेसबुकवर अपलोड केला आहे.उझबेकिस्तानविरुद्धच्या डेव्हिस कप लढतीत भारताकडून कोण कोण मैदानात उतरणार यावरुन हा वाद आहे.पेस-भूपतीच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅटनुसार, महेश भूपतीने लिअँडर पेसऐवजी रोहन बोपण्णाला पसंती दिली आहे. त्यामुळेच भारताकडून मैदानात उतरायला न मिळण्याच्या शक्यतेने पेस अत्यंत नाराज झाला आहे.मात्र पेसला संघाबाहेर ठेवण्यामागे कोणताही वैयक्तिक हेतू नाही, म्हटलं आहे. याबाबतच पेससोबत 5 मार्चला झालेलं व्हॉट्सअ‍ॅप चॅट भूपतीने फेसबुकवर सार्वजनिक केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप चॅट
भूपतीच्या म्हणण्यानुसार, अद्याप संघ निश्चित झालेला नाही, मात्र बंगळुरुतील परिस्थितीसाठी रोहन बोपण्णा योग्य आहे.मात्र पेसने याबाबत भूपतीवर भेदभावाचा आरोप केला होता. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅप चॅटचा हा फोटो फेसबुकवरुन डिलीट करण्यात आला आहे

भूपतीने फेसबुकवर काय म्हटलेय?
20 वर्षांच्या कारकीर्दीत माझा तथ्यांवर विश्वास आहे. मी सातत्याने प्रतिक्रिया देणं टाळतो, कारण मीडिया त्याला वैयक्तिक शत्रूता मानते. मला सर्वात आधी हे स्पष्ट करायचं आहे की ही कोणतीही वैयक्तिक दुश्मनी नाही. मी 1994 मध्ये डेव्हिस कप टीममध्ये सहभागी झालो, तेव्हा मी लिअँडर पेसचा फॅन होतो. त्यावेळी त्याला वेन फरेराविरुद्ध खेळताना भारावून गेलो होतो. तो जगातील दहाव्या क्रमांकाचा खेळाडू होता.पेसने त्याला सरळ सेटमध्ये हरवले होते. त्यानंतर मी त्याचा आणखी मोठा चाहता बनलो. टेनिसशिवाय मीडिया आणि टेनिस जगतात त्याच्याबद्दल आकर्षण होते.त्यानंतर घटना वेगाने बदलत गेल्या आहे.