पेन्शन योजनेच्या पुनरुज्जीवनाच्या मागणीसाठी शिक्षकांचे धरणे

0

तर्‍हाडी। अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शिरपूर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांचे एकदिवशीय देशव्यापी आंदोलन जुन्या पेन्शन योजनेचे पुनरूज्ीवन करणे व केंद्राप्रमाणे 7 वे वेतन आयो ग लागू, 6 व्या वेतन आयोगातील त्रुटी दुरूस्त करणे शिक्षकांसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापन करणे याकरीता शिरपूर तहसिल येथे एक दिवशीय धरणे आंदोलन करून पंतप्रधान, अर्थमंत्री भारत सरकार, राज्यपाल म.राज्य मुंबई यांना निवेदन देण्यात आले.

या आंदोलनाचे आयोजन शिरपूर अखिल महाराष्ट्र प्राथमिक संघाचे अध्यक्ष अशोक ठाकुर, सरचिटणीस देविदास निळे यांनी केले होते. त्यावेळी जुनी पेन्शन हक्क योजना जिल्हाध्यक्ष शशांक रंधे, भगवंतराव बोरसे, शरद सूर्यवंशी, चंद्रशेखर पाटील, भिमराव माळी, छोटू राजपूत, विनय नेरकर, ज्ञानेश्‍वर धनगर, गजानन जाधव, अनिल महिरराव, जितेंद्र राजपूत, जितेंद्र बाविस्कर, गोपाल चौधरी, अशोक महाजन, नरेंद्र महाजन, संतोष जाधव, दत्तू पाटील, राजेंद्र पाटील, ए.व्हे. पाटील, रवींद्र खोंडे, किशोर पाटील, भिकन शिरसाठ, नगराम जाधव व शिरपूर तालुक्याचे प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते.