पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत सलग चौदाव्या दिवशी वाढ

0

मुंबई:देशात करोनामुळे सर्वसामान्यांवर आर्थिक संकट असताना इंधन दरवाढीमुळे या संकटात अधिक भर पडली आहे. आज शनिवारी 20 रोजी सलग चौदाव्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ कायम ठेवले आले. आज दिल्लीत पेट्रोलच्या दरात ५१ पैशांची तर डिझेलच्या दरात ६३ पैशांची वाढ करण्यात आली. या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर ७८.८८ रूपये प्रति लिटर तर डिझेलचे दर ७७.६७ रूपये प्रति लिटर इतके झाले आहेत. तर, मुंबईत आज पेट्रोल ८५.६८ रुपये प्रति लिटर व डिझेल ७६.१ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पुण्यात पेट्रोल ८५.४१ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.६९ रुपये प्रति लिटर आहे.

जूनपूर्वीच्या दोन ते अडीच महिन्यांच्या कालावधीमध्ये पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ झाली नव्हती. या काळातील लॉकडाउनच्या कालावधीत इंधनाचा वापरही मोठय़ा प्रमाणात कमी झाला होता. मात्र, आता गेल्या १४ दिवसांपासून पेट्रोल दरवाढीचं सत्र मात्र कायम आहे. तर, एकूण १४ दिवसांमध्ये पेट्रोल ७.६० रुपये व डिझेल ८.२८ रुपये प्रति लिटर वाढले आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून इंधनावर प्रतिलिटर दोन रुपयांचा मूल्यवर्धित कर लावण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जूनपासून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरारवर कच्च्या तेलाची किंमत कमी असली तरी देशांतर्गत बाजारात मात्र पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढताना दिसत आहे.

Copy