पेट्रोलच्या दरात पुन्हा कपात; दिल्लीत पेट्रोल ७५ रुपयाच्या खाली

0

मुंबई-गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत घट होत आहे. आज पुन्हा पेट्रोल आणि डीझेलच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. दिल्लीत पेट्रोल ३५ पैसे तर डीझेल ४१ पैश्यांनी स्वस्त झाले आहे. कपातीनंतर दिल्लीत पेट्रोलचे दर प्रती लिटर ७४.४९ वर पोहोचले आहे तर डीझेलचे दर प्रती लिटर ६९.२९ रुपये आहे.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार दिल्ली ७४.४९ रुपये, कोलकाता ७६.४७ रुपये, मुंबई ८०.०३ रुपये, चेन्नईमध्ये ७७.३२ रुपये प्रती लिटर पेट्रोलचे दर आहे.

Copy