पेट्रोलचे भाव सलग तिसऱ्या दिवशीही घसरले

0

नवी दिल्ली: पेट्रोलची दरवाढ सलग दोन महिने झाल्यानंतर पेट्रोलच्या भावांमध्ये आता मोठ्या प्रमाणात घसरण होत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोलचे भाव ४० पैशांनी घसरल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोलचे दर घसरून ७५.२५ पैसे झाले आहेत तर डिझेलचे भाव ७० रुपयांपर्यंत खाली घसरले आहेत. मुंबईतही पेट्रोलचे भाव घसरून ८१.१० रुपयांपर्यंत कमी झाले आहेत. कोलकत्तामध्येही भाव ३१ पैशांनी घसरले आहे. भारतात सर्वत्र पेट्रोल ७५ ते ८३ रुपयांमध्ये मिळत आहे.

जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलांच्या भावांमध्ये मोठी घट होत असल्याने त्याचा परिणाम पेट्रोल डिझेलच्या भावांवर होतो आहे. जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाने नीच्चांकी आकडा गाठला आहे. अमेरिका,रशियाने कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवल्यामुळे बाजारातील कच्च्या तेलाची आवकही वाढली आहे. डिसेंबमध्ये ६ तारखेला यासंदर्भात ओपेकची मीटिंग होणार आहे. ओपेकच्या बैठकीत कच्च्या तेलाच्या भावांबद्दल निश्चिती करण्यात येणार आहेत.

Copy