Private Advt

पॅन्टच्या खिश्यातून 15 हजाराची रोकड लांबविली

जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परीसरातील एका घरातून चोरट्यांनी 15 हजारांची रोकड लांबवली. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पँटच्या खिशातून लांबवली रोकड
निर्मलाबाई जगन्नाथ महाजन (46, रा.गेंदालाल मिल) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला असून मंगळवार, 3 मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास घर बंद असताना अज्ञात चोरट्याने त्यांचा मुलगा सचिन महाजन यांच्या घरात टांगलेल्या पँन्टच्या खिशातून 14 हजार 800 रुपयांची रोकड लांबवली. याबाबत महाजन यांनी शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिल्यानंतर बुधवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक योगेश पाटील करीत आहे.