पृथ्वी शॉला दुखापत: पहिल्या कसोटीला मुकणार !

0

सिडनी-भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात २०-२०, एकदिवशीय आणि कसोटी मालिका होत आहे. २०-२० मालिका संपली आहे. आता कसोटी सामने होणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा सलामीवीर पृथ्वी शॉ याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीतून माघार घेतली आहे. लोकेश राहुलच्या अपयशी कामगिरीमुळे पहिल्या कसोटीत पृथ्वी शॉचे स्थान निश्चित मानले जात होते. मात्र, सराव सामन्यात क्षेत्ररक्षण करताना त्याला दुखापत झाली. वैद्यकीय अहवालानंतर तो पहिल्या कसोटीत खेळण्यासाठी तंदुरुस्त नसल्याचे स्पष्ट झाले. ६ डिसेंबरपासून पहिल्या कसोटीला सुरुवात होत आहे.

सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी पृथ्वीच्याने फलंदाजी करताना ६९ चेंडूत ६६ धावांची आक्रमक खेळी केली होती. त्यामुळे पहिल्या कसोटीसाठी त्याचा सहभाग निश्चित होता. परंतु सराव सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याला दुखापत झाली.