BIG BREAKING: पूर, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दहा हजार कोटींची घोषणा

0

मुंबई: राज्यात परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. अतिवृष्टीग्रस्त नुकसान भरपाईसाठी राज्य सरकारने दहा हजार कोटींची घोषणा केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ही घोषणा केली. दिवाळीपर्यंत ही मदत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दहा हजार रुपये प्रती हेक्टरची नुकसान भरपाई देणार आहे. दोन हेक्टरसाठी ही मदत देणार आहे.

केंद्र सरकारकडून ६८०० रुपये प्रती हेक्टरची मदत देण्यात येते, मात्र राज्य सरकारने प्रती हेक्टरसाठी १० हजार रुपयाची मदत करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.