पूर्ववैमनस्यातून महिलेसह मुलांना मारहाण

जळगाव- जुन्या घटनेच्या वादातून भिलपुरा येथील एका महिलेसह तिच्या दोघं मुलांना नातेवाईकांनी मारहाण केली. यात एक मुलगा जखमी झाला आहे. याबाबत चार जणांविरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शेख सलीम शेख अहमद (वय 48) हे शनिपेठमधील भिलपुरा मशिदीच्या मागे कुटुंबासह राहतात. काही दिवसांपूर्वी शेख यांच्या दोन महिन्यांच्या नातूचा उलटी होवून मृत्यू झाला आहे. यासंदर्भात मनात राग ठेवून शेख सलीम यांचे नातेवाईक शेख अक्तर शेख अहमद, शेख अकबर शेख नबी, रुकय्याबी शेख अकबर, शेख अक्रम शेख अकबर (सर्व रा. पाळधी, ता. धरणगाव) हे 14 मे रोजी जळगावातील भिलपुरा येथे शेख सलीम यांच्याकडे आले. त्यांनी शेख सलीम यांची पत्नी सुलतानाबी, मुलगीु नूर बानो, मुलगा अल्तमश यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. शेख अक्रम याने केलेल्या मारहाणीत अल्तमश हा जखमी झाला आहे. यात शेख सलीम यांच्य पत्नीचे मंगळसूत्रही तोडून नुकसान झाले. याबाबत शेख सलीम शेख अहमद यांच्या फिर्यादीवरुन शेख अक्तर शेख अहमद, शेख अकबर शेख नबी, रुकय्याबी शेख अबकर, शेख अक्रम शेख अकबर यांच्या विरुद्ध शनिपेठ पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला. तपास हेड कॉन्स्टेबल मनोज इंद्रेकर करीत आहेत.