पुरूषोत्तमनगर ग्रामपंचायतीची विभागस्तरीय तपासणी

0

शहादा । शहादा तालुक्यातील पुरूषोत्तमनगर येथील ग्रामपंचायतीस नुकतीच संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान 2016-17 विभागस्तरीय तपासणी विभागीय आयुक्त नाशिक विभाग यांच्या आदेशान्वये जिल्हा स्तरावर निवडण्यास आलेल्या प्रथम व द्वितीय क्रमांकाचा ग्रामपंचायतीची प्रथम तपासणी राज्यस्तरीय मुख संसाधन संस्थेतर्फे चंद्रपूर यांनी भेट दिली.

यावेळी समिती प्रमुख जगदीश लांडगे, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सारीका बारी, समिती सदस्य अनिल ठाकरे, श्रीकांत आंबेकर, गणेश पाटील, पंकज ठाकरे, जिल्हा परिषद विस्तार अधिकारी संजय पाटील, सरपंच ज्योतीबाई पाटील उपस्थित होते. ग्रामसेवक शरद पाटील, पोलीस पाटील, संपर्क अधिकारी प्रविण पाटील, छोटुलाल पाटील, गणेश पाटील, सुनिल चौधरी, विनोद पाटील, भरत गोसावी, महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. नाविण्यपूर्ण कामांची माहिती व लोकसहभागाबाबतची माहिती सरपंच ज्योतीबाई पाटील यांनी दिली. कामाबद्दल समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.