“पुन्हा निवडणुका घ्या, साधुसंत सरकार पाडतील”: भाजपचे थेट आव्हान

0

तुळजापूर: राज्यातील मंदिरे कोरोनामुळे बंद आहेत, मंदिरे सुरु करण्यात यावी अशी मागणी आता होऊ लागली आहे. भाजपने राज्यभरातील मंदिरे सुरु करण्यात यावी अशी मागणी केली आहे. राज्यभर आंदोलन देखील झाले. आज शुक्रवारी तुळजापूर येथे भाजपचे आंदोलन होते. मात्र सरकारने संचारबंदी लागू केल्याने भाजपने हे आंदोलन स्थगित केले आहे. यावेळी भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. मुगल, इंग्रजांपेक्षाही ठाकरे सरकार काळे आहे. धर्म विरोधी सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्याव्यात, साधुसंत हे सरकार पाडून दाखवतील असे आव्हान तुषार भोसले यांनी दिले आहे.

हिंदुत्व विसरलेले हे सरकार आहे, ब्रिटिशांपेक्षाही काळे हे सरकार आहे अशी टीका तुषार भोसले यांनी केले आहे.

दरम्यान  कलम १८८ अन्वये कोरोनाचे नियमभंग केल्याप्रकरणी तुषार भोसले यांच्यासह ९ जणांविरोधात तुळजापूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy