Private Advt

पुन्हा अपघात ! चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार 

पाचोरा ( प्रतिनिधी ) पाचोरा शहरात मालवाहू टाटा मॅजिक व मोटरसायकलची समोरासमोर धडक झाली. यात मोटरसायकलवरील एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शहरातील रेल्वे पुलाजवळील दैवयोग मंगल कार्यालयानजिक आज शुक्रवार दि.२४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाचोऱ्याकडून भडगावकडे भरधाव मालवाहू टाटा मॅजिक (क्रं. एम. एच. ०४ ई. वाय. १४८९) ने भडगावकडून पाचोराकडे जाणाऱ्या मोटरसायकल (क्रं. एम. एच. १९ सी. डी. ३७०८) ला जोरदार धडक दिल्याने मोटरसायकल वरील नईम खान युनुस खान (वय – २४) रा. बाहेरपूरा, पाचोरा या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याच्यासोबत असलेला संतोष खेमराज चव्हाण (वय – २१) रा. वडगाव जोगे ता. पाचोरा हा तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे.

मयत नईम खान व संतोष चव्हाण हे हात मजुरीचे काम करत आपले दैनंदिन काम आटोपून घरी जात असतांनाच हा अपघात झाला. जखमी संतोष चव्हाण त्याचेवर पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मयत नईम युनुस खान हा पाचोरा कॉग्रेसचा कार्यकर्ता होता.त्याच्या अकस्मात निधनाने कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी दु:ख व्यक्त करत घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीबाबत माहिती जाणून घेतली येणाऱ्या २९ डीसेंबर च्या पाचोरा तालुका मेळाव्यात नईम खान यांना नियुक्ती पत्र देण्यात येणार होते. मयत नईम खान यांस एक लहान मुलगी आहे. मयत नईम खान युनुस खान याचे पाश्चात्य आई, वडिल, पत्नी, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.