पुतळा स्थलांतरीत करण्याच्या मागणीसाठी मोर्चा

0

नंदुरबार। वेश्यावस्तीलगत असलेले महाराणा प्रताप यांच्या पुतळा स्थलांतरीत करण्यात यावा, या मागणीसाठी नंदुरबार येथे बुधवारी मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरूवात छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदीरापासून करण्यात आली. हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गावरून जात जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.
त्या ठिकाणी मोर्चेकर्‍यांच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चाला राजपूत समाजातील विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. नंदुरबार बसस्थानक परिसरात महाराणा पुतळा उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी वेश्यावस्ती असल्याने विटंबना होत असते. म्हणून हा पुतळा धुळे चौफुलीवर बसविण्यात यावा. या मागणीसाठी सर्वसमावेशक मोर्चा काढण्यात आला होता.