Private Advt

पुतण्या पडला काकीच्या प्रेमात आणि घेऊन पळून गेला

राजस्थान – येथे भरतपूरमधून पुतण्या आणि काकी प्रेमात पडले आणि घरातून पळून गेले असा विचित्र प्रकार घडला आहे. पीडित काकाने आपल्या पुतण्याविरोधात त्याची पत्नी पळवून नेल्याची तक्रार दाखल केली आहे

येथील किशनपूर कॉलनीमध्ये एका तरूणाचं दोन वर्षापूर्वी लग्न झालं होतं. पण त्याच्या १९ वर्षीय पत्नीत आणि त्याच्या २४ वर्षीय पुतण्याचं प्रेम प्रकरण सुरू झालं. गेल्या १६ ऑक्टोबरला रात्री काकी आणि पुतण्या घरातून फरार झाले. त्यांचा शोध दोन्ही परिवार घेत आहेत.

पीडित व्यक्तीने सांगितलं की, १६ ऑक्टोबरला रात्री त्याची पत्नी आणि पुतण्या घरातून पळून गेले. त्यांचा शोध घेतला जात आहे. दोघांविरोधात पोलिसात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. पीडितने सांगितलं की, गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्यात प्रेम प्रकरण सुरू होतं. दोघांना अनेकदा समजावून सांगण्याचाही प्रयत्न झाला होता. पण त्यांनी काही ऐकलं नाही आणि ते फरार झाले.

आजीने पुतण्याविरोधात दिली तक्रार

याप्रकरणी पोलिसांनी सांगितलं की, कमला नावाच्या महिलेने तक्रार दाखल केली आहे की, तिची सून आणि तिचा नातू पळून गेले आहेत. दोघांचा अनेक ठिकाणी शोध घेतला, पण त्यांचा काही पत्ता लागला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून दोघांचा शोध सुरू केला आहे.