पुण्यात २९ वर्षीय महिलेवर टेम्पोमध्ये बलात्कार

0

पुणे: पुण्यात २९ वर्षीय महिलेवर धावत्या टेम्पोमध्ये बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात भांडण झाल्यानंतर महिला आळंदी येथून पेरणे फाटा येथे जाण्यासाठी टेम्पोत बसल्यावर तिच्यावर ड्रायव्हर व क्लिनरने बलात्कार केला. या महिलेस रात्रभर टेम्पो चालकाने रात्रभर टेम्पो पिंपरी परिसरात फिरवून पीडित महिलेस महामार्गावर सोडून दिले. मंगळवारी रात्री ११ ते बुधवारी सकाळी ४ दरम्यान प्रकार घडला आहे. या प्रकरणी पीडित महिलेने आळंदी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी आयशर टेम्पो चालक, क्लिनर विरोधात गुन्हा दाखल केला आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडिता मंगळवारी रात्री आकाराच्या सुमारास घरात भांडणे झाल्याने नातेवाईकांकडे जाण्यासाठी आळंदी येथे वाहनाची वाट पाहत उभा होती. त्यावेळी त्या ठिकाणी आयशर टेम्पो आला. क्लिनरने त्या महिलेस पेरणे फाटा येथे सोडतो असे सांगून आत बसवले. टेम्पो आळंदीतून बाहेर पडला. टेम्पो चालकाने टेम्पो पेरणे फाटाच्या दिशेने न नेता पिंपरी चिंचवड परिसरात आणला. रात्रभर टेम्पो पिंपरी चिंचवड शहरातील वेगवेगळ्या परिसरात फिरवला.

दरम्यानच्या काळात ड्रायव्हर आणि क्लिनरने पीडित महिलेवर बलात्कार केला. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास पीडित महिलेस पुणे बेंगळुरू महामार्गावर सोडून टेम्पो चालक आणि क्लिनर पसार झाले. पीडित महिलेने त्यानंतर तेथील एका सोसायटीच्या वॉचमनच्या मदतीने पोलिसांशी संपर्क साधल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. शिरगाव पोलिस चौकीत या प्रकरणी गुन्ह्याची नोंद करून, तो तपासासाठी आळंदी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.