पुण्यात रस्त्यावर फिरणार्‍या २ हजार जणांवर गुन्हे

0

पुणे : लॉकडाऊनच्या काळात विनाकारण रस्त्यावर येणार्‍या लोकांना पोलिसांनी १८८ कलमाखाली कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरात तब्बल १२१ ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली आहे तर आत्तापर्यंत कलम १८८ अंतर्गत २ हजार ७२७ जणांवर गुन्हा दाखल केला गेला आहे. आजपर्यंत ९ हजार ३३५ नागरिकांना नोटीस बजावल्या आहेत. त्याचबरोबर ५ हजार ९३० वाहने जप्त केल्याचे सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सांगितले आहे.
शुक्रवारी एका दिवसात ४२९ जणांवर १८८ कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. तर १ हजार ४३५ नोटीस बजावल्या आणि १ हजार ३०१ गाड्या जप्त केल्या. त्याचबरोबर ड्रोनच्या माध्यमातून टेरेसवर गर्दी करणार्‍यांवर आतापर्यंत वीस गुन्हे दाखल केलेत. ड्रोनची संख्या वाढवून आणखी गुन्हे दाखल केले जाणार आहेत.पेट्रोलिंग करणार्‍या वाहनातून ही व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे. या माध्यमातूनही गुन्हा दाखल होणार आहे जीवनावश्यक वस्तूंची साठेबाजी आणि जास्त दराने विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येत असून आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Copy