नंदुरबारमध्ये बनावट दारूचा कारखाना उध्वस्त: एकाला अटक

0

नंदुरबार। बनावट दारूचा कारखाना उध्वस्त केल्याची कारवाई नंदुरबार पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात येऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील दसरा मैदान परिसरात असलेल्या एका गोडाऊनमध्ये बनावट दारू निर्मिती केली जात असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन छापा टाकला. त्या ठिकाणी बनावट दारु बनविण्यासाठी वापरण्यात येणारे 230 लिटर स्पिरीट , मेकडॉलच्या बाटल्या सापडल्या. स्कारपियो गाडीसह एकूण पाच लाख 95 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल आढळून आला आहे, लॉकडाऊनच्या काळात बनावट दारूचा कारखाना उध्वस्त केल्याने मद्य साम्राटांमध्ये खळबळ उडाली आहे, या प्रकरणी पोलिसांनी पंकज नामदेव चौधरी यास अटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Copy