पुण्यात महिलेसोबत बळजबरी: मारहाणीत दोन्ही डोळे निकामी

0

पुणे: जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाला आहे. यावेळी महिलेने प्रतिकार केले असता, झालेल्या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाले आहे. आरोपींविरोधात विनयभंगसाह इतर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मजुरी करणारी महिला बाहेर शौचास गेले असता आरोपींनी हल्ला केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेने महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होऊ लागली आहे.

Copy