पुण्यात ज्वेलर्समध्ये गोळीबार, कामगार जखमी

0

पुणे : पुण्यातील येवलेवाडी परिसरातील गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी आलेल्या चार अज्ञातांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. यात दुकानातील कामगार जखमी झाला आहे. ही घटना आज (बुधवार) रोजी दुपारी पावणेदोनच्या सुमारास घडली. घटनास्थळी कोंढवा पोलीस दाखल झाले आहेत. या घटनेमुळे कोंढवा परिसरात एकच खळबळ उडाली असून अमृत परिहार (वय २७) असे जखमी कामगाराचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, येवलेवाडी येथे आज दुपारी गणेश ज्वेलर्सवर दरोडा टाकण्यासाठी चार अज्ञात व्यक्ती आले होते. त्या दरम्यान दुकानातील कामगार अमृत परिहारने आरडाओरडा केली. त्यावेळी त्या चौघांपैकी एकाने त्याच्यावर गोळीबार केला. यामध्ये तो जखमी झाला आहे. जखमी तरुणास जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Copy