पुण्यात गोळ्या झाडून महिलेची हत्या

0

पुणे : वडगावशेरी येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय ३४ ) या महिलेची दोन तरुणांनी घरात घुसून गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली. ही घटना सकाळी आठ वाजून १५ मिनिटांनी घडली.दरम्यान या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी आठच्या दरम्यान दोन तरुण दुचाकीवरून पॅशन किंवा स्प्लेंडर या गाडीवरून येऊन इंद्रायणी गृहरचना सोसायटीतील धनदीप या इमारतीतील पहील्या मजल्यावर घुसले. एकता ब्रिजेश भाटी व यांचे पती घरात बसलेले होते. या दोन 2 तरुणांनी दरवाजा वाजवल्यानंतर एकता भाटी यांनी दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच महिलेच्या छातीवर गोळ्या झाडून तरुण पसार झाले. याप्रकरणी चंदननगर पोलिस परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासत असून कशातून हा प्रकार घडला आहे याचा तपास करीत आहेत. भाटी यांची खानावळ होती. ते विमाननगरमधील एका खाजगी कंपनीला जेवण पुरवत होते. पोलिसांनी मेसमध्ये काम करणाऱ्यांचे कर्मचाऱ्यांसोबतच त्यांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले आहेत.

Copy