पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयातील एका नर्सल कोरोना: 30 नर्स क्वारंटाइन

0

पुणे: कोरोना विषाणू विरुद्ध सुरू असलेल्या युद्धात आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी अग्रस्थानी आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा म करता आरोग्य कर्मचारी रात्रंदिवस रुग्णसेवा करत आहे. दरम्यान पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील एका ४५ वर्षांच्या नर्सला करोनाची लागण झाली आहे. संबंधीत नर्सच्या संपर्कात झालेल्या ३० नर्सना क्वारंटाइन करण्यात आले आहे.

रविवारी पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज १३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १८९५ वर पोहचली आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा करोना झाल्याचं उघड

Copy