पुण्यातील पाच कामगारांचा कर्नाटकात अपघाती मृत्यू

0

विजयपूर-कर्नाटकातील विजापूर (विजयपूर) जिल्ह्यात बोलेरो गाडी आणि ट्रकमध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरोतील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला तर २ जण गंभीर जखमी आहे. बोलेरोत पुण्यातील कामगार असल्याचे सांगण्यात येते. जखमींना उपचारासाठी नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

विजयपूर येथील बबलेश्वर तालुक्यातील होनगनहळ्ळी गावाजवळ हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात बोलेरोचा पूर्णपणे चुराडा झाला. बोलेरोतील ५ जण जागेवरच ठार झाले. दोघे गंभीर जखमी आहेत. सर्व मृत हे पुण्यातील असून ते महामार्गावरील कामगार आहेत. दरम्यान, या अपघाताप्रकरणी बबलेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.