पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये तोडफोड

0

पुणे : योग्य उपचार न मिळाल्याचे कारण सांगत रुग्णाच्या नातेवाईकांनी फातिमानगर येथील इनामदार हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली. शरीफ शेख (वय 40 वर्ष) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने शनिवारी (6 ऑक्टोबर) संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास इनामदार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर काही वेळातच हॉस्पिटल प्रशासनाकडून शेख यांना मृत घोषित करण्यात आले. हॉस्पिटलकडून वेळेत योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप करत रुग्णाच्या नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये तोडफोड केली.

साधारण 500 लोकांचा जमाव हॉस्पिटल बाहेर जमा झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. दरम्यान, नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय मृतदेह ताब्यात न देण्याचा पवित्रा हॉस्पिटल प्रशासनाकडून घेण्यात आला होता. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला