चिंताजनक: पुण्यात आज कोरोनाचे नवीन 15 रुग्ण

0

पुणे: मुंबईपाठोपाठ पुण्यातही कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज शुक्रवारी आणखी १५ करोनाग्रस्त रूग्णांची त्यात भर पडली आहे. या १५ पैकी ११ जणांवर नायडू रूग्णालयात तर चार जणांवर ससून रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आज १५ रुग्ण नव्याने कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने पुणे शहरातील रूग्णांची संख्या १९० झाली आहे तर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या २२५ झाली आहे.

Copy