पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिवपदी नियुक्ती

0

पुणे: पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयाच्या उपसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्र सरकारने यासंदर्भात पत्रक काढून याबाबत माहिती दिली आहे. नवल किशोर राम हे २००८ च्या बॅचचे सनदी अधिकारी आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रीकर परदेशी, पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेदेखील या पूर्वीपासून पंतप्रधान कार्यालयात उपसचिव पदावर काम करत आहेत. आता त्यांच्यानंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे पुण्यामधून पंतप्रधान कार्यालयात जाणारे तिसरे अधिकारी ठरले आहेत. जिल्हाधिकारी नवल किशोर राम हे पुढील पुढील चार वर्षे किंवा पुढील आदेश येईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयात कार्यरत राहणार आहेत.