पुण्याचा शानदार ‘विजय’

0

हैदराबाद । पुणे सुपरजायंट्सने सनरायझर्स हैदराबादला शक्य झालं नसून पुण्याने विजयी घोडदौड सुरुच ठेवली आहे. जयदेव उदानकटच्या शानदार हॅटट्रिकसह पाच बळीच्या जोरावर पुण्याने हैदराबादचा 12 धावांनी पराभव करत गुणतालिकेत दुसरे स्थान काबीज केले आहे. दोन्ही संघासाठी महत्वाच्या असलेल्या या सामन्यात पुण्याने अखेर बाजी मारली. एकवेळ मजबूत स्थितीत असलेल्या हैदराबादला जयदेवच्या मार्‍यासमोर तग धरता आली नाही. जयदेवने 4 षटकात 30 धावा देत 5 बळी घेतले. हैदराबाद विजयासाठी शेवटच्या षटकात 13 धावांची गरज होती. मात्र जयदेवने शेवटच्या षटकात त्याने दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या चेंडूवर तीन बळी घेत हॅटट्रिकसह पाच बळी काढत हैदराबादचा विजय हिरावून घेतला. हैदराबादकडून वार्नर 40, युवराज सिंह 47 आणि शिखर धवन 19 या तीनच खेळाडूंना तीन अंकी संख्या गाठता आली.

पुण्याची फलंदाजीही ढेपाळली
मागच्या सामन्यातील पराभवामुळे सावध झालेल्या सनरायजर्स हैदराबादने पुण्याविरोधात आक्रमक खेळी खेळत पुण्याला 148 धावांवर रोखले. रायझिंग पुणे सुपरजायंट्सने 8 विकेट्स गमावत 148 धावा केल्या असून हैदराबादसमोर विजयासाठी 149 धावांचे आव्हान ठेवले होते. गेल्या सामन्यात आपल्या तुफान फटकेबाजीमुळे चर्चेत आलेला राहुल त्रिपाठी पुन्हा एकदा असा काही पराक्रम करेल असे वाटत होते. पण तो चार चेंडूत फक्त एक धाव करु शकला. स्टीव्ह स्मिथही स्वस्तात बाद झाला असता, मात्र त्याला दोन वेळा जीवनदान मिळाले. स्मिथला मिळालेल्या जीवनदानाचा तसा हैदराबादला काही तोटा झाला नाही. स्मिथने 39 चेंडूत फक्त 34 धावा केल्या. स्टोक्सने आक्रमक खेळीला सुरुवात केली होती. त्याने 25 चेंडूत 39 धावा केल्या. राशीद खानने त्याची विकेट घेत माघारी धाडले. शेवटच्या ओव्हर्समध्ये धोनीने आपल्या स्टाईलप्रमाणे तुफानी फटकेबाजी केली. पण नेमक्या शेवटच्या ओव्हरला त्याची विकेट गेली. त्याने 21 चेंडूत 31 धावा केल्या. हैदराबादकडून सिद्धार्थ कौलने चार विकेट्स घेतल्या.

चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत खेळणार
विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेली टीम इंडिया जूनमध्ये होणार्‍या चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळणार आहे. गेल्या काही दिवसांपासून टीम इंडिया या स्पर्धेत भाग घेणार की नाही, याबाबत संभ्रम होता. मात्र आता हा संभ्रम दूर झाला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे हंगामी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी याबाबतच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा येत्या सोमवारी होण्याची शक्यता आहे. आयसीसीकडून मिळणार्‍या महसुलाच्या हिश्श्यावरून नाराज झालेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ लवकरात लवकर जाहीर करण्याचे आदेश प्रशासकीय समितीने दिले होते. 7 मे रोजी बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण बैठक (डॠच्) घेतली जाणार आहे. या बैठकीत आयसीसीचा निषेध म्हणून बीसीसीआय चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेऊ शकते, असे बोलले जात होते. या पार्श्वभूमीवर प्रशाकीय समितीने बैठक होण्याआधीच बीसीसीआयला संघ जाहीर करण्याच्या सूचना दिल्या होत्या.