पुणे-हावडा दरम्यान विशेष रेल्वे धावणार

0

भुसावळ : प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी पुणे व हावडा दरम्यान विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डाउन 02279 सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 16 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत पुणे येथून दररोज 6.35 वाजता सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी हावडा येथे 3.55 वाजता पोहोचेल. अप 02280 सुपरफास्ट स्पेशल ट्रेन 14 फेब्रुवारीपासून पुढील आदेशापर्यंत हावडा स्टेशन येथून दररोज 10.10 वाजता सुटेल आणि पुण्याला तिसर्‍या 7.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला दौंड कोर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड जंक्शन, जळगाव, भुसावळ जंक्शन, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, नागपूर, भंडारा रोड, तुमसर, गोंदिया, डोंगरगड, राजनांदगाव, दुर्ग, रायपूर, भटपारा ,बिलासपूर, चांपा, रायगड, बजरंगनगर, झारसुगुडा, राउरकेला, चक्रधरपूर, टाटानगर, खडगपूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन एसी -2 टायर, सहा एसी थ्री टायर, 10 स्लीपर क्लास, पाच द्वितीय श्रेणी आणि एक पेंट्री कार जोडण्यात येणार आहेत. केवळ आरक्षित तिकिट असलेल्या प्रवाश्यांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल तसेच प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

Copy