पुणे-सोलापूर महामार्गावर तीन वाहनांचा विचित्र अपघात

0

इंदापूर : इंदापूर येथिल जुना पुणे-सोलापूर महामार्गावरील भरणे पेट्रोल पंपासमोर शिवशाही बस, महिंद्रा पिकअप व एसटी बसचा विचित्र अपघात झाला. यामध्ये महिंद्रा पिकप वाहन दोन बसच्यामध्ये सापडल्याने वाहनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.

शिवशाही बस तुळजापूरहून पुण्याकडे जात असताना इंदापूर येथील पुणे-सोलापूर जुन्या महामार्गावरून जात होती. त्यावेळी बस चालकाने भरणेमामा पेट्रोल पंपासमोर अचानक ब्रेक दाबला. त्यामुळे बस थांबली. त्याचवेळी शिवशाहीच्या पाठीमागून सोलापूरहून राशिनकडे जात असलेले महींद्रा पिकप वाहन शिवशाहीवर पाठीमागून जाऊन धडकले. पिकअपच्या पाठीमागून लातुरहून पुण्याला जाणारी एसटी बस पिकअप गाडीला पाठीमागून जोरात धडकली. दोन बस गाड्यांच्यामध्ये महींद्रा पिकअप वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. इंदापूर पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Copy