पुणे शहरात पावसाची जोरदार हजेरी

0

पुणे:- पुणे शहर तसेच जिल्ह्यात पावसाने बुधवारी दमदार हजेरी लावली. शहरातील सर्व भागांना पावसाने चांगलेच झोडपून काढले. संध्याकाळी ४ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली, अद्यापही पावसाचा जोर कायम आहे.

सकाळपासूनच शहरात मोठ्या प्रमाणावर उकाडा जाणवत होता. त्याचबरोबर आकाशात ढगही दाटून आले होते. दुपारच्या सुमारास अधूनमधून पावसाचे थेंब प़डत होते. मात्र, त्यानंतर संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास शहरातील अनेक भागांमध्ये अचानक अंधारुन येऊन जोरदार पावसाला सुरुवात झाली. यावेळी कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या लोकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Copy