पुणे शहरात गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

0

पुणे- संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी २९ रोजी बंद राहणार आहे. याशिवाय शुक्रवारीही ३० रोजी देखील बहुतांश भागात उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे, असे पुणे महानगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.

पर्वती जलकेंद्र पंपिंग, रॉ-वॉटर पंपिंग, वडगाव जलकेंद्र तसेच लष्कर जलकेंद्र, एसएनडीटी/ वारजे जलकेंद्र, नवीन होळकर पंपिंग स्टेशन येथे विद्युत/ पंपिंग विषयक आणि स्थापत्य विषयक कामे करण्यात येणार आहेत. तसेच महावितरणच्या नवीन पाचशे एमएलडी प्लान्टसाठी नवीन वीज पुरवठ्याचे कामही करण्यात येणार आहे. त्यासाठी संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा गुरूवारी संपूर्ण दिवस बंद राहणार आहे.

Copy