पुणे शहरातील उद्याने बंद करण्याचा महापालिकेचा निर्णय

0

पुणे : शहरात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर उद्याने बंद करण्यात आली होती. लॉकडाऊन नियमांतील शिथिलतेनंतर शहरात सुरू करण्यात आलेली महापालिकेच्या उद्यानांना पुन्हा टाळे लावण्यात आले आहे. उद्यानांचा वापर केवळ फिरण्यासाठी होत नसल्याचे आणि नागरिकांकडून पुरेशी काळजी घेतली जात नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे उद्याने बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली ३३ उद्याने बंद करण्यात आली आहेत. शहरातील उद्यानात नागरिकांकडून सोशल डिस्टिंशीग, तसेच इतर नियमांचे पालन होत नसल्याच्या तक्रारी येत होत्या.

महापालिके ची शहरात २०१ लहान-मोठी उद्याने आहेत. या उद्यानांपैकी मध्यवर्ती भागातील ३३ उद्याने पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आली. नागरिकांकडून योग्य ती काळजी घेतली जात नसल्याचे उद्यान विभागातील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्याबाबत हटकल्यास नागरिकांकडून वाद घालण्याचे प्रकारही सातत्याने पुढे येत होते. या पार्श्वभूमीवर उद्याने बंद करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

Copy