पुणे विशेष गाडी पुण्याऐवजी दौंडपर्यंत धावणार

भुसावळ : भुसावळ-पुणे-भुसावळ विशेष गाडी आता दौंडपर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 27 मे ते 29 जुलैपर्यंत दरम्यान हा बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 01135 भुसावळ-पुणे गाडी भुसावळ येथून दर गुरुवारी 06.15 वाजता सुटल्यानंतर त्याच दिवशी दौंड येथे 3.10 वाजता पोहोचणार आहे. गाडी क्रमांक 01136 पुणे-भुसावळ विशेष गाडी दौंडे येथून दर गुरुवारी 12.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी भुसावळ येथे 8.45 वाजता पोहोचणार आहे. गाडीला जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर स्थानकावर थांबा देण्यात आला. केवळ कन्फर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष ट्रेनमध्ये बसण्याची परवानगी देण्यात येईल व प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागणार आहे.