पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमासाठी 1 जून पासून प्रवेश अर्ज

3

पुणे:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत येणाऱ्या पदवी, पदव्युत्तर, आंतरविद्या शाखीय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा ऑगस्टच्या पहिल्या घेतली जाणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली आहे. या अभ्यासक्रमाच्या पात्रता परीक्षेसाठी 1 ते 30 जून दरम्यान विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार असल्याची माहिती दिली आहे.

प्रवेश परीक्षेची तारीख आणि निकालाची माहिती संबंधित शैक्षणिक विभागाकडून प्रसिद्ध करण्यात येईल असे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. या प्रवेश परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गातील विद्यार्थाना प्रवेश अर्जासाठी 500 रुपये तर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 350 रुपये शुल्क आकारण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना विद्यपीठाच्या वेबसाईटवरून अर्ज भरता येणार आहे.

पुणे विद्यापीठातील अभ्यासक्रमासाठी 100 गुणांची दोन तासांची प्रवेश परिक्षा राहणार आहे. त्यातील 20 गुण सामान्य ज्ञान तर उर्वरित 80 गुणांचा पेपर मुख्य विषयावर राहणार आहे. परीक्षेचा निकाल विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित केला जाणार आहे.

Copy