पुणे रेल्वे स्टेशनवर आरोपींकडून गोळीबार; पीआय गंभीर जखमी

0

पुणे : सिनेमांमध्ये दाखवितात तसा तसा थरार आज पुणे स्टेशनवरील प्रवाशांना पाहायला मिळाला. आज सकाळी चंदननगर येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटी मधील ज्ञानदीप इमारतीत राहणाऱ्या एकता ब्रिजेश भाटी (वय 34) यांच्यावर गोळीबार करणारे आरोपी पळून चालले असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा पुणे स्टेशनवर शोध घेत असताना आरोपींनी पोलिसांना पाहताच गोळीबार केला. या गोळीबारात पोलीस निरीक्षक गजानन पवार गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान तीन पैकी दोन आरोपींना पकडण्यात आले आहे. दरम्यान पवार यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

चंदननगर येथील इंद्रयणी गृहरचना सोसायटीत राहणाऱ्या एकता भाटी यांच्यावर सकाळी ८ वाजून 15 मिनिटांनी दोन तरुणांनी घरात घुसून गोळीबार केला होता. यात भाटी यांचा मृत्यू झाला आहे.