पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ !

0

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपचे मुरलीधर मोहोळ हे विजयी जाहले आहे. मोहोळ यांच्या विरोधात आघाडीचे प्रकाश कदम यांचा पराभव झाला. या निवडणुकीतचे वैशिष्टय म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजप – शिवसेना युती तुटल्याचे पडसाद या बघायला मिळाले. यावेळी शिवसेनेने आघाडीच्या उमेदवारांना मतदान केले. महापौर पदाच्या निवडणुकीत मोहोळ यांना 97 तर कदम यांना 59 मते मिळाली. यावेळी मनसेचे 2 नगरसेवक तटस्थ तर पाच नगरसेवक मतदानाच्यावेळी गैरहजर होते. कौस्तुभ दिवेगावकर यांनी पीठासन अधिकारी म्हणून काम बघितले.

2017साली झालेल्या निवडणुकीनुसार भाजपला निर्विवाद बहुमतानुसार 97 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 39 नगरसेवक आहेत. शिवसेनेचे 10, काँग्रेसचे 9, मनसे 2 आणि इतर 5 अशी नगरसेवक संख्या महापालिकेत असल्याने मोहोळ यांची निवड निश्चित असल्याचे मानले जात होती.

Copy