पुणे जिल्ह्यासाठी केंद्राकडून मिळो 61 कोटींचे भांडवल

0
आरपीआयने राबविला उपक्रम
लोणावळा : यावर्षी रिपब्लिकन पक्षाचा 61 वा वर्धापनदिन आहे. यानिमित्त सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांच्या व्हेंच्युर कॅपिटल फंड या सरकारी योजनेमधून पुणे जिल्ह्यात 61 कोटी रुपयांचे भांडवल सामान्य नागरिकांना कर्ज स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागातून सर्वसामान्य नागरिकांना उद्योग व्यवसायाकरिता भांडवल उपलब्ध करुन देण्याचे आश्‍वासन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष तथा रिपाई महाराष्ट्र राज्य रोजगार समितीचे अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांनी दिले.रिपब्लिकन पार्टीचा मेळावा नुकताच लोणावळ्यात पार पडला. यावेळी मार्गदर्शन करताना वाघमारे बोलत होते.
सुवर्ण संधी आहे
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वाघमारे म्हणाले की, यावर्षी रिपब्लिकन पक्षाचा 61 वा वर्धापनदिन आहे. त्यामुळे 61 कोटींचे भाग भांडवल नागरिकांसाठी रामदास आठवले यांनी उपलब्ध करून दिले आहे. यामुळे ज्यांना उद्योग-व्यवसाय सुरू करायचा आहे. त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नोकरी करण्यापेक्षा छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे. त्यासाठी शिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. या भाग-भांडवलाचा सर्वांनी उपयोग करून घ्यायचा आहे. मावळ तालुका रिपाईचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी मावळ तालुक्यात रिपब्लिकन पक्ष घराघरात पोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. यावेळी रिपाईचे पश्‍चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष संभाजी साळवे, जिल्ह्याचे नेते खंडूशेठ जाधव, गणेश गायकवाड, अशोक गायकवाड, संजय अडसुळे, शिवाजी मखरे, धम्मरक्षित  जाधव, लोणावळा शहराध्यक्ष कमलशिल म्हस्के, नगरसेवक दिलीप दामोदरे, वसंत देसाई, अशोक सरवदे, रवींद्र गायकवाड, अनिल वाघमारे, मिलिंद भालेराव, चंद्रकांत गायकवाड आदी उपस्थित होते.